About CEP Activities

 

Home

Seminars


Monthly Student Seminar

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व आपला विषय कशा पध्दतीने मांडावा याची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी सत्र नियोजनाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगळा विषय दिला जातो त्याप्रमाणे विद्यार्थी सेमिनारची तयारी करतात, विषयानुसार PPT Presentation तयार करुन विद्यार्थी सेमीनार सादर करतात. याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर विद्यार्थी सेमिनार सादर करतात.

Interviews

Articles in News Paper

Articles in News PaperArticles in News Paper

All leading newspapers timely publish articles providing guidance to aspirants of competitive exams. Directors of the Academy – Mr Tukaram Jadhav and Mr. Malhar Patil along with their colleagues have frequently written articles pertaining to preparation of UPSC/ MPSC / PSI / STI. The list of published articles in leading newspapers and magazines is as follows.

Guest Lectures

Guest LecturesFelicitation

FelicitationEvents

EventsIn order to benefit students from remote/rural areas, The Unique Academy in coordination with some organizations conducts regular workshops.

ग्राम सर्वेक्षण

  • विद्यार्थ्यांना सामाजिक, ग्रामीण भागातिल स्थानिक प्रश्न समजावेत आणि त्यातून सामाजिक जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने ग्राम सर्व्हेक्षणाचे आयोजन केले जाते. ग्राम सर्व्हेक्षण करण्यासाठी मौजे रामवाडी (ख.) ता.रेणापूर जि.लातूर तसेच मौजे निवळी जि. लातूर या गावांची निवड करण्यात आली. ग्राम सर्वेक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी माहिती गोळा करण्यासाठी 122 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रश्नावली आधारे ग्राम सर्व्हेक्षण केले जाते. मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम सर्व्हेक्षण अहवाल तयार करण्यात येतो आणि गावासाठी काही सामाजिक योजना राबविण्याचा प्रयत्न केला जातो.

वृध्दाश्रमास भेट

  • विद्यार्थ्यांना समाजातील मूल्य व्यवस्थेचा अभ्यास व्हावा यासाठी व त्यांच्यामध्ये सामाजिक मूल्य निर्माण व्हावेत यासाठी लातूर येथील मातोश्री वृध्दाश्रमास दिनांक 13-03-2017 ते 15-03-2017 या कालावधीत एकूण 91 विद्यार्थ्यांनी भेट दिली व वृध्दांचे प्रश्न जाणुन घेतले व त्यावर सविस्तर अहवाल तयार केला. अशा प्रकारच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये, समाजाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली जाते.

कार्यशाळा

स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

  • दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा (दि. 21-02-2017 ते 22-02-2017) :-
  • प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारपदावर विराजमान होण्याचे ध्येय, महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना करियरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालयाने आत्तापर्यंतच्या वाटचालीत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख मार्गदर्शन केले आहे.
  • राजर्षी शाहू महाविद्यालय भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून लातूरमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची निश्चित दिशा मिळविण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर व द युनिक ऍ़कॅडमी, पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळा दि. 21-02-2017 ते 22-02-2017 या कालावधीत महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळांचे आयोजन करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाते.

शैक्षणिक सहल

  • विद्यार्थ्यांना वर्गाध्यापनाबरोबरच त्यांना प्रत्यक्षात सभोवतालच्या नैसर्गीक, धार्मिक व सामाजिक पर्यावरणात नेहुन त्यांना स्थळानुसार निसर्गामध्ये व समाजामध्ये असणारे बदल प्रत्यक्ष पहाता यावेत व अनुभवता यावेत या उद्देशाने दिनांक 28/08/2016 रोजी एकदिवसीय शैक्षणीक सहल (कपिलधारा, चाकरवाडी, मुकुंदराज) आयोजित करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना विधानमंडळाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव होण्यासाठी दि. 08-12-2016 ते 11-12-2016 या कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. अशा प्रकारे प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक वारसा असलेल्या तसेच इतर प्रसिध्द ठिकाणांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करुन भेट दिली जाते.

व्याख्यान पुष्प 4 थे (विषय : स्पर्धा परीक्षा)

  • व्याख्यान पुष्प 4 थे (विषय : स्पर्धा परीक्षा) - दिनांक 16-01-2017 :
  • व्याख्याते : चिरंजीव प्रसाद (विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र)
  • स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र च्या वतीने व्याख्यान पुष्प 4 थे (विषय : स्पर्धा परीक्षा) चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य अनिरुध्द जाधव (सहसचिव, शिव छत्रपती शिक्षण संस्था), प्रमुख पाहुणे मा. चिरंजीव प्रसाद (विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र), मा. अनिल राठोड (पोलीस अधिक्षक, लातूर), प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. पी.आर. देशमुख (उपाध्यक्ष, शिव छत्रपती शिक्षण संस्था,लातूर), डॉ. दि.बा. गोरे (सहसचिव, शिव छत्रपती शिक्षण संस्था,लातूर), प्रा. आर.एल. कावळे (सदस्य, शिव छत्रपती शिक्षण संस्था,लातूर), मा. धर्मराज हल्लाळे (सदस्य, शिव छत्रपती शिक्षण संस्था,लातूर), डॉ. एस.डी. साळुंके (प्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर), डॉ. पी.एन.सगर (उपप्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर), डॉ. महादेव गव्हाणे (उपप्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) हे उपस्थित होते. व्याख्याते मा. चिरंजीव प्रसाद यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा या विषयावरील व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता असते, नियोजनबध्द अभ्यास कसा करावा याचे मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशातून स्पर्धा परीक्षेमध्ये लातूर पॅटर्न निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारच्या विविध विषयावरील व्याख्यानांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले जाते.

Gallery

Placement Cell Report

Placement Cell Report